Home / महाराष्ट्र / Tin Can Phone : अमेरिकेत नव्या फोनची क्रेझ ! स्मार्टफोन ऐवजी टीन कॅन

Tin Can Phone : अमेरिकेत नव्या फोनची क्रेझ ! स्मार्टफोन ऐवजी टीन कॅन

Tin Can Phone : अमेरिकेत स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मुलांवर होणार्‍या परिणामांबाबत चिंता व्यक्त होत असताना टिन कॅन नावाचे लँडलाईनसारखे उपकरण...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Tin Can Phone : अमेरिकेत स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मुलांवर होणार्‍या परिणामांबाबत चिंता व्यक्त होत असताना टिन कॅन नावाचे लँडलाईनसारखे उपकरण वेगाने लोकप्रिय होत आहे. टिन कॅन टेक्नॉलॉजीज या कंपनीने विकसित केलेले हे उपकरण मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी पर्याय आहे.


टिन कॅन हे वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञानावर आधारित असून, दिसायला जुन्या लँडलाईन फोनसारखे आहे. या उपकरणाद्वारे मुलांना एकमेकांशी मोफत कॉल करता येतात. आपत्कालीन सेवांशी संपर्क साधता येतो. पालकांच्या परवानगीने इतर क्रमांकावर कॉल करण्यासाठी दरमहा 10 डॉलरचे शुल्क आकारले जाते.


एप्रिल 2025 मध्ये बाजारात आल्यानंतर या उपकरणाची विक्री झपाट्याने वाढली आहे. मर्यादित प्रसिद्धी असूनही टिन कॅनची लोकप्रियता मुख्यतः तोंडी प्रचारामुळे वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे. अनेक शाळांनीही या उपकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कॅन्सस सिटीजवळील नेटिव्हिटी पॅरिश स्कूल येथे सुमारे 95 टक्के कुटुंबांनी हे उपकरण स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांना दूरध्वनी क्रमांक यादीचा वापर करण्याची सवय लावून पारंपरिक संवाद पद्धती पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये ऐकण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे पालक व शिक्षकांचे मत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेट किटल्सन यांनी 1990 च्या दशकातील संवाद पद्धती पुन्हा आणण्याच्या उद्देशाने हे उपकरण तयार केल्याचे सांगितले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या