Home / महाराष्ट्र / Vidhanparishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूक २०२६: भाजपच्या गोटात उमेदवारीसाठी ‘धक्कातंत्र’; पराभूतांना संधी नाकारण्याचे नवे धोरण?

Vidhanparishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूक २०२६: भाजपच्या गोटात उमेदवारीसाठी ‘धक्कातंत्र’; पराभूतांना संधी नाकारण्याचे नवे धोरण?

Vidhanparishad Election 2026 : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे....

By: Team Navakal
Vidhanparishad Election 2026 
Social + WhatsApp CTA

Vidhanparishad Election 2026 : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपने ३० इच्छुकांच्या नावांची प्राथमिक यादी तयार केली आहे. या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही यादी अंतिम मंजुरीसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली असली, तरी उमेदवारी निश्चित करताना दिल्लीतून एक मोठी अट लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावेळी ‘राजकीय पुनर्वसन’ करण्यापेक्षा ‘संघटन मजबुती’वर अधिक भर देणार आहे. ज्या नेत्यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले आहे, अशा पराभूत उमेदवारांना पुन्हा विधानपरिषदेच्या माध्यमातून मागच्या दाराने सभागृहात घेण्यास पक्षश्रेष्ठी अनुत्सुक असल्याचे समजते. “जे नेते लोकांमधून निवडून येऊ शकत नाहीत, त्यांचे पुनर्वसन करणे पक्षहिताचे नाही,” असे मत एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे. यामुळे उमेदवारीची आस धरून बसलेल्या अनेक प्रस्थापित आणि बड्या नेत्यांच्या अपेक्षांना मोठा सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत. त्याऐवजी, निष्ठावान कार्यकर्त्यांना, संघटनेत सक्रिय असणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणांची जुळवाजुळव करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान पार पडणार आहे. यामध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या सातव यांना पक्षाकडून पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानपरिषदेच्या एकूण जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येण्याचा अंदाज आहे. जर प्रज्ञा सातव यांची जागा निश्चित झाली, तर उर्वरित चार जागांसाठी पक्षातील ३० हून अधिक इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल.

येत्या चार ते पाच दिवसांत भाजपचे केंद्रीय नेतृत्व या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. उमेदवारांच्या निवडीत भाजप पुन्हा एकदा आपल्या ‘धक्कातंत्रा’चा वापर करून अनपेक्षित नावे समोर आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या