Home / महाराष्ट्र / Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला अडचणीत! पोलिसांत तक्रार दाखल

Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला अडचणीत! पोलिसांत तक्रार दाखल

Girish Mahajan: मुंबईतील वरळी परिसरात वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला...

By: Team Navakal
Girish Mahajan
Social + WhatsApp CTA

Girish Mahajan: मुंबईतील वरळी परिसरात वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. गिरीश महाजन यांच्याशी हुज्जत घालणे आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत या महिलेविरोधात पोलिसांत धाव घेण्यात आली आहे.

नेमकी तक्रार काय?

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार नोंदवली आहे. झेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकप्रतिनिधी आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी अशा प्रकारे उद्धटपणे वागणे खपवून घेतले जाणार नाही. या महिलेने वापरलेली भाषा आणि तिचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे सांगत, पोलिसांनी लवकरात लवकर एफआयआर (FIR) दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळी डोमच्या दिशेने एक मोर्चा काढला होता. या मोठ्या मोर्चामुळे वरळी आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो वाहनचालक तासनतास रस्त्यावर अडकून पडले होते.

याच वेळी एका महिलेने आपला संयम गमावला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला. “जे काही बोलायचे आहे ते मोकळ्या मैदानात जाऊन बोला, रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ नका,” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला पोलिसांशीही वाद घालताना आणि बाटल्या भिरकावताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वादाचे कारण आणि पार्श्वभूमी

महिला आरक्षणाशी संबंधित 131 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेत आवश्यक बहुमत न मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ 298 खासदारांनी मतदान केले, तर 230 जणांनी विरोधात मतदान केले होते. दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक रखडले असून, त्यावरूनच भाजपने हा निषेध मोर्चा आयोजित केला होता.

या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही लोक सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल महिलेच्या बाजूने उभे राहिले आहेत, तर काही जण लोकप्रतिनिधींशी वागण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता वरळी पोलीस या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – 

Sanju Samson Records: संजू सॅमसनने वानखेडेवर इतिहास रचला! रोहित-राहुलला मागे टाकत नोंदवले ‘हे’ 5 मोठे विक्रम

Trump on India : ट्रम्प यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर अमेरिकेकडून डॅमेज कंट्रोल; भारताने स्पष्ट केली भूमिका

Maharashtra FDA Rules : हॉटेलमध्ये जेवताना सावधान! पनीरच्या नावाखाली दुसरंच काहीतरी तर खात नाही ना? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Web Title:
संबंधित बातम्या