Alpha Movie Release Date: यशराज फिल्म्सच्या (YRF) स्पाय युनिव्हर्समधील ‘अल्फा’ हा चित्रपट गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची मुख्य भूमिका असलेला हा अॅक्शनपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनेकदा रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर, आता हा चित्रपट वेळेपूर्वीच म्हणजेच ‘प्रीपोन’ करून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, हा चित्रपट आता 3 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी 3 जुलै रोजी ‘धमाल 4’ रिलीज होणार होता, परंतु तो आता पुढे ढकलून 17 जुलै करण्यात आला आहे. त्यामुळे 3 जुलैला कोणताही मोठा चित्रपट नसल्याने निर्माते आदित्य चोप्रा यांनी ‘अल्फा’ याच दिवशी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
Alpha Movie Release Date: दोन आठवड्यांचा मिळणार मोकळा रस्ता
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या नवीन रिलीज डेटमुळे ‘अल्फा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे:
- पहिली दोन आठवडे अनइंटरप्टेड रन: 3 जुलैला रिलीज झाल्यानंतर 10 जुलै रोजी कोणताही मोठा बॉलिवूड चित्रपट नाही. त्यामुळे ‘अल्फा’ला सलग दोन आठवडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याची सुवर्णसंधी मिळेल.
- नोलनच्या चित्रपटाशी टक्कर टळली: 17 जुलै रोजी हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’ हा मोठा चित्रपट रिलीज होत आहे. त्याच दिवशी ‘धमाल 4’ देखील येणार आहे. या मोठ्या क्लॅशमधून ‘अल्फा’ आता पूर्णपणे सुरक्षित राहून आधीच गल्ला जमावेल.
Alpha Movie Release Date: पारंपारिक गुप्तहेरापेक्षा वेगळी आणि डार्क ‘इनसाईड स्टोरी’
‘अल्फा’ चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करत असून हा चित्रपट स्पाय युनिव्हर्समधील इतर चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि गडद (डार्क) असणार आहे.
- अँटी-हिरो कॅरेक्टर: या चित्रपटात आलिया भट्ट पारंपारिक देशभक्त गुप्तहेराच्या भूमिकेत नसून एका किलर (अॅसॅसिन) च्या भूमिकेत दिसणार आहे, जिचे पात्र ग्रे शेड्समध्ये आहे. स्पाय युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे.
- कलाकारांची तगडी फौज: चित्रपटात आलियासोबत शर्वरी देखील एका एजंटच्या भूमिकेत अॅक्शन करताना दिसेल. तर मुख्य खलनायकाची (व्हिलन) भूमिका बॉबी देओल साकारत आहे. याशिवाय अनिल कपूर हे ‘वॉर 2’ मधील कर्नल विक्रांत कौल यांच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत.
Alpha Movie Release Date: हृतिक रोशनचा धमाकेदार कॅमिओ
चित्रपटात आणखी एक मोठे सरप्राईज प्रेक्षकांसाठी असणार आहे. ‘वॉर’ चित्रपटातील स्टार हृतिक रोशन हा ‘मेजर कबीर ‘ या आपल्या लोकप्रिय पात्रासह ‘अल्फा’मध्ये एक विशेष कॅमिओ करताना दिसणार आहे. या सर्व गोष्टींमुळे ‘अल्फा’ हा स्पाय युनिव्हर्समधील आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ठरणार आहे.
हे देखील वाचा – IPL 2026 Final: किंग कोहली vs प्रिन्स गिल! RCB रचणार इतिहास की GT मारणार बाजी? कधी व कुठे पाहता येईल फायनल? वाचा










