Home / मनोरंजन / Awarapan 2 Teaser: तब्बल 19 वर्षांनंतर इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ चा टीझर रिलीज; ‘तो फिर आओ’ गाण्याने जागवल्या जुन्या आठवणी

Awarapan 2 Teaser: तब्बल 19 वर्षांनंतर इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ चा टीझर रिलीज; ‘तो फिर आओ’ गाण्याने जागवल्या जुन्या आठवणी

Awarapan 2 Teaser: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता इम्रान हाश्मी याच्या कारकिर्दीतील सर्वात सर्वोत्तम आणि कल्ट सिनेमा मानल्या...

By: Team Navakal
Awarapan 2 Teaser: तब्बल 19 वर्षांनंतर इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2' चा टीझर रिलीज; 'तो फिर आओ' गाण्याने जागवल्या जुन्या आठवणी
Social + WhatsApp CTA

Awarapan 2 Teaser: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता इम्रान हाश्मी याच्या कारकिर्दीतील सर्वात सर्वोत्तम आणि कल्ट सिनेमा मानल्या गेलेल्या ‘आवारापन’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा झाली आहे. पहिल्या भागाला 19 वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी ‘आवारापन २’ चा थरारक आणि तितकाच भावूक करणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

या टीझरच्या सुरुवातीलाच इम्रान हाश्मीच्या जुन्या पात्राची म्हणजेच ‘शिवम’ची एन्ट्री होते. “वेदनेशी माझे खूप जुने नाते आहे,” हा त्याचा संवाद ऐकताच चाहत्यांच्या अंगावर काटा येतो. विशेष फिल्म्सने हा टीझर शेअर करताना लिहिले आहे की, “19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. शिवम परत आला आहे. तुम्ही त्याची कथा जिवंत ठेवलीत, आता तो ही कहाणी पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे.”

टीझरमधील मुख्य आकर्षणे आणि जुनी आठवण

या नव्या टीझरमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणारे अनेक प्रसंग आणि संवाद पाहायला मिळतात:

  • आलियाच्या थडग्याचे दर्शन: टीझरमध्ये शिवम पहिल्या भागात श्रिया सरनने साकारलेल्या ‘आलिया हमीद’ या पात्राच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होताना दिसतो, ज्यामुळे पहिल्या भागाची कथा थेट पुढे जाणार असल्याचे स्पष्ट होते.
  • नवे स्टारकास्ट: या भागात जुन्या पात्रांसोबतच दोन मोठे चेहरे पाहायला मिळणार आहेत. टीझरमध्ये अभिनेत्री दिशा पटानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिकांची झलक दाखवण्यात आली आहे.
  • ‘तो फिर आओ’ गाण्याची जादू: पहिल्या भागातील सुपरहीट ठरलेले ‘तो फिर आओ’ हे गाणे या टीझरमध्ये पार्श्वसंगीतात नवीन स्वरूपात ऐकायला मिळते. हे गाणे संपूर्ण टीझरमध्ये एक वेगळीच भावनिक पकड निर्माण करते.

“काही लोकांच्या गोष्टी त्यांच्या इच्छेने संपत नाहीत, त्यांच्या कहाण्या इतरांसाठी लिहिल्या जातात,” या संवादावरून शिवम या भागात जुना हिशोब चुकता करण्यासाठी आणि स्वतःचे ‘आवारापन’ संपवण्यासाठी गुंडांशी भिडताना दिसणार आहे.

पहिला भाग फ्लॉप, पण गाण्यांनी मिळवून दिला कल्ट दर्जा

मोहित सुरी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘आवारापन’ हा मूळ चित्रपट 29 जून 2007 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु, कालांतराने या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्याला एका ‘कल्ट’ सिनेमाचा दर्जा मिळाला. या चित्रपटातील गाणी आजही बॉलीवूडमधील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक मानली जातात.

आहा या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करत असून विशेष फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 30 जूनची डेडलाईन हुकली; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार कर्जमाफी

Web Title:
संबंधित बातम्या