Tumbbad 2 Release Date : लोककथा आणि अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याने भरलेला ‘तुंबाड’ हा चित्रपट आठवतोय? हस्तरची ती भीतीदायक गोष्ट आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. सोहम शाहच्या बहुप्रतीक्षित ‘तुंबाड 2’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. विशेष म्हणजे, या भागात सोहम शाहसोबतच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Tumbbad 2 Release Date: कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्टर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘तुंबाड 2’ हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
पोस्टरवर ‘प्रलय येईल’ असे लिहिलेले असून, तीन रहस्यमयी मूर्ती दिसत आहेत. “पापी भूतकाळ आणि भयाण भविष्य… हाव वाढत आहे आणि लोभाचा वारसा सुरूच राहणार,” असे कॅप्शन सोहम शाहने या पोस्टरला दिले आहे.
Tumbbad 2 Release Date: काय असेल खास?
सोहम शाहच्या मते, हा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य आणि गडद असणार आहे. जुनी पौराणिक कथा पुढे नेतानाच यात नवनवीन पैलू जोडले गेले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आदेश प्रसाद करत असून, मूळ चित्रपटाचा आत्मा टिकवून ठेवत एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Tumbbad 2 Release Date: नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री
यावेळी या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याच्या समावेशामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या कास्टिंगची घोषणा करण्यात आली होती. सोहम शाह फिल्म्स आणि पेन स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
Tumbbad 2 Release Date: ‘तुंबाड’चा प्रवास
2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. मात्र, ओटीटी आणि नंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो एक ‘कल्ट क्लासिक’ ठरला. 2025 मध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आणि तेव्हा त्याने मोठा नफा कमावला. त्यानंतर लगेचच निर्मात्यांनी सिक्वेलवर काम सुरू केले होते.
हे देखील वाचा –
Vidhan Parishad Election Process: विधान परिषद निवडणूक कशी होते? वाचा











