Vaibhav Sooryavanshi AI Chip Controversy: आयपीएल 2026 चा नवा स्टार आणि राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावर त्याची बॅट ज्या प्रकारे तळपतेय, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वैभवच्या या अद्भूत फटकेबाजीमुळे सोशल मीडियावर एक अजब चर्चा सुरू झाली होती की, त्याच्या बॅटमध्ये एखादी ‘AI चिप’ लपवलेली आहे का? आता खुद्द वैभवनं यावर मिश्किल भाष्य केलं आहे.
पाकिस्तानी विश्लेषकाचा तो ‘गमतीशीर’ दावा
वैभवची फलंदाजी पाहून पाकिस्तानचे क्रिकेट विश्लेषक डॉ. नौमान नियाज यांनी एक मजेशीर विधान केलं होतं. वैभव इतका लहान असूनही ज्या सहजतेने मोठे षटकार खेचतोय, ते पाहून त्यांनी म्हटलं होतं की, या मुलाची बॅट एखाद्या लॅबमध्ये तपासायला हवी. कदाचित त्याच्या बॅटमध्ये एखादी AI चिप बसवली असावी, कारण त्याचे शॉट्स हे अवास्तव वाटतात. हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.
𝘉𝘢𝘵 𝘱𝘦 𝘈𝘐 𝘤𝘩𝘪𝘱 𝘩𝘢𝘪 𝘬𝘺𝘢 𝘵𝘶𝘮𝘩𝘢𝘳𝘦?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2026
Vaibhav answers 😂💗 pic.twitter.com/uZcqABbaGS
Vaibhav Sooryavanshi AI Chip Controversy: वैभवनं जिंकली मनं
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वैभवला थेट विचारण्यात आलं की, “तुझ्या बॅटमध्ये खरंच AI चिप आहे का?” त्यावर वैभवने हसून अतिशय निरागसपणे उत्तर दिलं.
वैभव म्हणाला, “ही चिप देवानं लावून दिली आहे. त्यानं वरूनच सांगितलं होतं की, तुझ्या बॅटमध्ये मी काहीतरी वेगळं देऊन पाठवतोय. मी फक्त त्याच गोष्टीचा वापर करत आहे.” त्याच्या या उत्तराने केवळ टीकाकारांची तोंडं बंद केली नाहीत, तर चाहत्यांची मनंही जिंकली.
Vaibhav Sooryavanshi AI Chip Controversy: तंत्रज्ञान की प्रतिभा?
आजच्या युगात जेव्हा एखादा खेळाडू आपल्या वयापेक्षा कित्येक पटीने मोठी कामगिरी करतो, तेव्हा लोक नवनवीन तर्क लावायला सुरुवात करतात. पूर्वी ज्याला ‘दैवी देणगी’ म्हटलं जायचं, त्याला आता आधुनिक काळात ‘AI’ किंवा ‘अल्गोरिदम’ म्हटलं जात आहे. मात्र, वैभवच्या प्रतिसादाने हे स्पष्ट केलं की, त्याच्या या यशामागे कोणतंही तंत्रज्ञान नसून फक्त कठोर मेहनत आणि मिळालेली नैसर्गिक देणगी आहे.
या १५ वर्षांच्या मुलामध्ये केवळ फटकेबाजी करण्याची क्षमता नाही, तर मैदानाबाहेरील चर्चांना कशा प्रकारे हाताळायचे, याचा परिपक्वपणाही दिसून येतोय.
हे देखील वाचा – UAE OPEC Exit: भारतासाठी गूड न्यूज! ओपेकच्या बंधनातून युएई मुक्त; आता स्वस्त आणि सुरक्षित दराने मिळणार कच्चे तेल











