अँजिओप्लास्टीचे वृत्त खोटे अमिताभ यांची प्रतिक्रिया

मुंबई

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (८०) यांना अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे काल सांगितले जात होते. मात्र, हे वृत्त खोटे असून आपली तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती अमिताभ यांनी दिली आहे.

अमिताभ काल संध्याकाळी इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्याला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत अभिषेक बच्चनदेखील उपस्थित होता. या सामन्याचा एक फोटोदेखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटो सोबत त्यांनी लिहीले होते की, ‘इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्याच्या संध्याकाळचा अनुभव खूप चांगला होता. सचिनसोबत वेळ घालवला आणि क्रिकेटबद्दल त्याच्याकडून खूप काही जाणून घेतले.’ सामना संपल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी अमिताभ यांनी सांगितले की, ‘मला काहीच झालेले नाही. ती बातमी खोटे आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top