अंड्यांच्या भावात मोठी उसळी एक डझन अंडी ९४ रुपयांना!

मुंबई:

राज्यात अनेक ठिकाणी गारठा वाढला असून थंडीमुळे अंड्याचे भाव कडाडले आहेत. थंडीचा जोर वाढू लागल्याने अंड्याच्या दरात प्रति नग २ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, तर १ डझन अंड्यांच्या दरात ६ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. रविवारपर्यंत ८० ते ८४ रुपये डझन दराने विकली जाणारी अंडी आता थेट ९४ रुपये डझन दराने विकली जात आहेत. अंडी महागल्याने सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागला आहे.

हिवाळा जसा येऊ लागतो तसा अंड्यांच्या दरात मोठी वाढ होत असते. हिवाळ्याच्या हंगामामुळे अंड्याचा किरकोळ विक्रीचा दर काही भागात ९० रुपये प्रति डझन डझन वाढला आहे. अंधेरी लोखंडवाला, जोगेश्वरी पश्चिम आणि शिवाजी पार्कमध्ये सोमवारी अंड्यांचा दर डझनामागे ६ ते १० रुपयांपर्यंत वाढून ९० रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर वांद्रे, मालाड, नेरुळमध्ये अंड्यांचा दर ८० रुपये डझन सुरु होता. अंडी कडाडल्याने घरगुती, बेकर्स, मिठाईवाले, संस्थागत खरेदीदार आणि हॉटेल्स यांना सर्वांना दरवाढीचा बोजा पडणार आहे. अंड्याचे दर जानेवारी २०२३ महिन्यांत पहिल्यांदाच ९० रुपयांपर्यंत पोहचले होते. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने किरकोळ दर ७८ रुपये प्रति डझन असल्याचे जाहीर केले आहे. परंतु वाहतूक आणि मजूरीच्या खर्चामुळे दुकानदार साधारण ६ ते १० रुपये जादा आकारतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top