अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

पोर्ट ब्लेअर

अंदमान बेटावर आज सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्र १० किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राने दिली आहे. अंदमानमध्ये झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top