अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सोमवारी सकाळी तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांना ई मेलद्वारे जीव मारण्याची धमकी येण्याची चार दिवसांतील ही तिसरी वेळ आहे. धमकी पाहिल्यानंतर पोलिसांनी अंबानींच्या घराची सुरक्षा वाढवली. हा मेल अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवण्यात आला. त्यावर लिहिले आहे, सुरक्षा कितीही कडक असली तरी ‘ एक स्नायपर ‘ तुम्हाला मारू शकतो. पोलीस माझा माग काढू शकत नाहीत किंवा मला अटक करू शकत नाहीत.़

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top