अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारात ‘क्रोबा’ला ५० लाखांची बोली

अकलूज – देशभरात प्रसिद्ध असलेल्या अकलूजच्या घोडेबाजारात नामवंत जातीचे घोडे विक्रीसाठी दाखल होतात.यंदा घोडेबाजाराच्या उद्घाटनाआधीच काळा कुळकुळीत उंच आणि लांब शरीरयष्टीचा ‘कोब्रा ‘हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे.या घोड्याला चक्क ५० लाखांची बोली लागली आहे.

अकलूज येथे दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने घोडे बाजार भरवला जातो.यंदा उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यातून काटेवाडी,मारवाड,पंजाब,सिंध असे जातीवंत घोडे विक्रीसाठी आले आहेत, यावर्षी जवळपास दोन हजारहून अधिक घोडे बाजारात दाखल झाले आहेत.घोडे व्यापारी आणि ग्राहकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगली सोय केली आहे. घोड्यांसाठी चारा ,पाणी, सावली,आरोग्य सेव तसेच चोख सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांना राहण्याची सोयदेखील केली आहे.

यंदाचा घोडेबाजार विक्रमी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.कारण यावेळी उद्घाटनाआधीच एक कोटी रूपयांची घोडेविक्री झाली आहे.दरवर्षी या घोडेबाजारात सात ते आठ कोटीची उलाढाल होते. यंदा उत्तरप्रदेशच्या बरेलीतून आलेल्या कोब्रा नावाच्या घोड्याला तब्बल ५० लाख रूपयांची बोली लागली आहे.या घोड्याचे पाय,शेपटी,कान डोळयाच्या कडासुध्दा काळया आहेत.हा घोडा मारवाड जातीचा तेलीया कुम्मेत प्रकारातील असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील आणि सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top