अखेर राजकोटमधून भाजपच्या रूपालांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकोट- केंद्रीय मंत्री आणि राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी अखेर राजपूत समाजाच्या प्रखर विरोधानंतरही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. क्षत्रिय समाजाबद्दल रूपाला यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजपूत
समाजाने रूपाला यांचा निषेध करत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत.

पुरुषोत्तम रूपाला यांनी मंगळवारी शहरात दोन किमी लांबीच्या रोड शोनंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.
रुपाला यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभाव जोशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला तेव्हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपचे राज्यसभा सदस्य केसरीदेवसिंह झाला आणि गुजरात सरकारमधील कॅबिनेट मंत्री भानुबेन बाबरिया उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर रूपाला म्हणाले की,”माझ्या पक्षाने ठरविल्यानुसार मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तरी क्षत्रिय समाजाने त्यांच्या आणि भाजपच्या हितासाठी मला पाठिंबा द्यावा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top