अदानी समूहाच्या तांबे प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली ;

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने काल गुजरातमधील मुंद्रा येथे जगातील सर्वात मोठा तांबा (कॉपर) उत्पादन कारखान्याचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा केली. समूह प्रमुख अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या कच्छ कॉपरने ग्राहकांना कॅथोड्सची पहिला साठा पाठवून त्यांच्या १.२ अब्ज डॉलरच्या ग्रीनफिल्ड कॉपर रिफायनरीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.

पहिल्या टप्प्यात वर्षभरात ०.५ दशलक्ष टन शुद्ध तांबे तयार केले जातील. आर्थिक वर्ष मार्च २०२९ पर्यंत १० लाख टन उत्पादन क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे. या नव्या कारखान्यामुळे भारत चीन आणि इतर देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. ज्यामुळे वेगाने तांबे उत्पादन वाढवत आहेत. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांबे उत्पादन महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सोलर फोटोव्होल्टेइक (पीव्ही), पवन आणि बॅटरी-आधारित ऊर्जा उद्योगांना तांब्याची आवश्यकता असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top