अफगाणिस्तानात पावसाचा कहर! पुरामुळे ३३ जणांचा मृत्यू

काबूल

अफगाणिस्तानमध्ये काल मुसळधार पावसामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये सुमारे ६०० घरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अफगाणिस्तान सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितल की, अफगाणिस्तानमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी आहेत.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे तालिबान प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी काल सांगितले की, काबूल, कंदहार आणि इतर अनेक ठिकाणी अचानक पूर आला आहे. त्यामुळे घरे उद्ध्वस्त झाली, तर सुमारे २०० जनावरांचा मृत्यू झाला. या पुरामुळे सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन आणि ८५ किलोमीटर (५३ मैल) पेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान,येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातील बहुतांश ३४ प्रांतांमध्ये आणखी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top