अमिताभ बच्चन अयोध्यावासी होणार १४.५ कोटींचा भखंड विकत घेतला

अयोध्या :

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी १४.५ कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या ७-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक भूखंड खरेदी केला आहे. त्यांनी विकत घेतलेली ही जागा राम मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांचा हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, या जागेवर अमिताभ बच्चन हे अंदाजे १०,००० स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या ठिकाणी हा प्लॉट खरेदी केला आहे, त्या ‘सरयू इन्क्लेव्ह’चे उद्घाटनदेखील २२ जानेवारी रोजीच होणार आहे. हा प्रोजेक्ट एकूण ५१ एकरांमध्ये पसरला आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘ ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे. या जागेवर घर बांधण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अयोध्येत संस्कृती आणि अध्यात्माचा एक विलक्षण मिलाप आहे. हे शहर जितके पारंपरिक आहे, तितकेच आधुनिकदेखील आहे. या ग्लोबल स्पिरिच्युअल ठिकाणी मला घर बांधायचे आहे.’

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या आधी लखनौजवळील काकोरी येथे जमीन खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन हे स्वतः अलाहाबादचे आहेत. त्यांची लखनौ येथील जमीन देखील अयोध्येपासून अवघ्या ४ तासांच्या अंतरावर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top