अमित शहांची रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा

रत्नागिरी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा घेणार आहे. अद्याप रत्नागिरी-सिंधुदु्र्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही.या उमेदवारीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशात अमित शहा यांनी रत्नागिरीत २४ एप्रिलला जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. आता या सभेत शहा हे कोणावर हल्लाबोल करणार अशी चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top