अमेरिकेत टिकटॉक बंदीचे विधेयक संसदेत मंजूर

वॉशिंग्टन

अमेरिकेत लवकरच टिकटॉक बंद होणार आहे. अमिरेकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात टिकटॉक बंदीचे विधयेक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांच्या प्रचंड पाठिंब्याने सभागृहात मंजूर झाले. हे विधेयक अमेरिकन संसदेत दोन्ही पक्षांच्या ३६०-५८ च्या जबरदस्त मताधिक्याने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार, लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टीकटॉकच्या चीनस्थित मालकाने आपला हिस्सा विकला नाही तर अमेरिकेत त्याच्यावर बंदी घालण्यात येईल. यासाठी सहा महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. विधेयकातील सुधारित तरतुदी आता वरिष्ठ सभागृह सिनेटकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. भारताने २०२० मध्ये टिकटॉकवर बंदी घातली होती. टिकटॉकवर बंदी घालणारा भारत पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता अमेरिकेने देखील टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top