अयोध्येत राम मंदिराचे ‘हवाई दर्शन’ भाविकांसाठी दर्शनाची विशेष योजना

अयोध्या

अयोध्येत राम मंदिर सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून लाखो पाहूणे अयोध्येत येणार आहेत. भाविकांना प्रभू रामांच्या दर्शनासोबतच अयोध्या नगरीचा देखावा देखील पाहता यावा यासाठी उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने हवाई दर्शनाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये भाविकांना राम मंदिराचे हवाई दर्शन आणि अयोध्या नगरीची हवाई सफर करता येणार आहे.

हवाई सफरसाठी हेलिकॉप्टर रामकथा उद्यानातून उड्डाण करणार आहे. या विमान प्रवासासाठी प्रत्येक भाविकाला ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. देशभरातील भाविकांना राम मंदिराचे सहज दर्शन घेता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार राज्याचा पर्यटन विभाग अयोध्येच्या हवाई दर्शनाची विशेष मोहिम राबविणार आहेत. देशातील कोणत्याही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि देवस्थानात हवाई दर्शनाचा हा पहिलाच प्रयोग असेल. यावेळी भाविकांना हेलिकॉप्टरमधून राम मंदिर, हनुमानगढी आणि सरयूसह इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे.

राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग यांनी सांगितले की, अयोध्या आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचा भाविकांना विशेष अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी रामकथा पार्कच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उपस्थित राहणार आहेत. हेलिकॉप्टरमध्ये एकावेळी ६ प्रवासी बसू शकतील. विमान प्रवासानंतर रामभक्तांना पुन्हा या हेलिपॅडवर सोडण्यात येणार आहे. २६ जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top