अलिबाग- विरार मार्गिकेसाठी एप्रिल महिन्यात कंत्राट निघणार

अलिबाग –

बहुप्रतीक्षित अलिबाग- विरार बहुद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. येत्या काही दिवसांत या कामासाठी निविदा अंतिम केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यामुळे हा मार्ग रायगडकरांसाठी विकासाच्या नवीन वाटा निर्माण करणार असे सांगितले जाते. निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीसह, एल अँड टी, अप्को, अफकॉन, पटेल इन्फ्रा, वेलस्पून इंटरप्रायजेस, मोन्टोकार्लो यासह अन्य एका कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा एप्रिल महिन्यात खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top