अष्टलक्ष्मीच्या मूर्तींना गुजरात मध्यप्रदेशात माेठी मागणी

नंदुरबार

दिवाळी निमित्त नंदुरबार शहरामध्ये मूर्तिकारांची लक्ष्मीची मूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. मूर्तिकार चार इंचापासून एका फुटापर्यंतच्या लक्ष्मीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. विविध देवीच्या आकारातील अष्टलक्ष्मी मुर्त्यांना गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याच्यासोबतच शेजारील गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मुर्तींसाठींचे बुकिंग झाले आहे. गुजरातमध्ये अष्टलक्ष्मीच्या मुर्त्यांना मोठी मागणी आहे. या मुर्त्यांची किंमत ५१ रुपयांपासून ते १५०० रुपये पर्यंत असून लक्ष्मीच्या मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळी सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. नंदुरबार शहरामध्ये जवळपास ४० ते ५० कारखान्यांमधून शेकडो कारागीर काम करत आहेत. बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या मुर्त्या तयार झाल्या असून त्यांना गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top