आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी

नवी दिल्ली – काँग्रेसने उत्तर प्रदेशातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की,‘पक्षाविरुद्ध वारंवार वक्तव्ये केल्याच्या तक्रारींवरून प्रमोद कृष्णम यांची तत्काळ हकालपट्टी करण्याच्या उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.` प्रमोद कृष्णम यांनी अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक केले होते. २२ जानेवारीला ते अयोध्येलाही गेले होते. या कार्यक्रमात सहभागी न झाल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही २ फेब्रुवारीला मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी १९ फेब्रुवारी रोजी कल्की धामच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदींना आमंत्रित केले.
प्रमोद कृष्णम यांनी मोदींसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांनाही कल्की धामला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top