आजपासून मुंबईत वाहनांची रखडपट्टी !सायनचा पूल बंद

मुंबई- तब्बल ११० वर्षे जुना असलेला सायनचा रेल्वे उड्डाण पूल पाडून नवीन पुलाची पुनर्बाधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी आज मध्यरात्रीपासून सायन रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने मुंबईत वाहनांची मोठ्या प्रमाणात रखडपट्टी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूककोंडी पुढील दीड वर्षे मुंबईकरांना सहन करावी लागणार आहे.
सायन पुलाचे पाडकाम सुरू करण्यास वाहतुक पोलिसांची परवानगी मिळाली आहे.त्यामुळेच हे काम हाती घेण्यात आले आहे.या कामामुळे वाहतुककोंडी फोडण्याचे नवीन काम आता वाहतुक पोलिसांना करावे लागणार आहे.त्यासाठी बॅरिकेड्स लावणे आणि दिशादर्शक फलक लावणे या कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.सायनचा नवीन पूल सध्याच्या ४० मीटरऐवजी ५१ पर्यंत वाढविला जाणार आहे. हा पूल एकाच स्पॅनवर असणार आहे.हा स्पॅन रेल्वे मार्गावर नसेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top