आजपासून मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेस सुरू !

मुंबई- दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई- जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन उद्या शनिवार ३० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाडीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.

जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती संभाजीनगर, नाशिक,मनमाड आणि ठाणे असे एकूण ४ थांबे असतील. या चारही रेल्वे स्टेशनवर ही वंदे भारत एक्सप्रेस २-२ मिनिटे थांबेल. ही ट्रेन जालना येथून सकाळी ५.०५ वाजता निघेल आणि सकाळी ५.५३ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे पोहचेल.त्यानंतर नाशिकला सकाळी 8.38 वाजता आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर सकाळी ११.१० वाजता पोहोचल. मुंबई येथे ११.५५ वाजता ही ट्रेन दाखल होईल. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील ही ट्रेन उपलब्ध होणार आहे. ही ट्रेन मुंबईहून दुपारी १.१० वाजता निघेल आणि ठाणे येथे दुपारी १.४० वाजता पोहोचेल. त्यानतंर नाशिकला ४.२८ वाजता आणि औरंगाबादमध्ये ७.०८ वाजता पोहोचेल. अखेरचा थांबा असलेल्या जालना येथे रात्री ८.३० वाजता ही गाडी दाखल होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top