आज मुरुड तालुक्यात पाच तास भारनियमन

मुरुड – मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असलेल्या पाब्रे येथील मुख्य विद्युतवाहिनीचे देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी १६ एप्रिल रोजी पाच तास संपूर्ण मुरूड तालुक्यात भारनियमन असल्याची माहिती मुरूड महावितरणचे मुख्य उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी दिली.

उद्या मंगळवारी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत भारनियमन करण्यात येणार आहे.त्यामुळे या तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपली विजेसंबंधीची सर्व कामे भारनियमनापूर्वीच करून घ्यावीत व महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन कृष्णात सुर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top