आता क्यू आर कोड लावूनच हापूस आंब्याची विक्री होणार

रत्नागिरीतील- गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील अगदी हापूससोबत साधर्म्य असलेला आंबा हापूसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून खपवला जात आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फायदा व्हावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक शेतकरी व विक्रेते सहकारी संस्थेने क्यूआर कोड लावूनच हापूसची विक्री केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोकणच्या हापूस आंब्याला जीआय हे भौगोलिक मानांकन फार पूर्वीच मिळाले आहे. कोकणच्या हापूस आंब्याची एक विशिष्ट ओळख आहे आणि तो ग्राहकांनाही विशेष भावतो. त्यामुळे आता कोकण हापूस आंबा उत्पादक शेतकरी व विक्रेते सहकारी संस्थेकडून राज्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना क्यूआर कोड दिले जाणार आहे.या क्यूआर कोडमुळे संबंधित गुणवत्तापूर्ण अस्सल हापूस आंब्याची ग्राहकांना ओळख होण्यास मदत होणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून त्या आंब्याची पॅकिंग तारीख, खराब होण्याची तारीख म्हणजे एक्सपायरी डेट, तसेच संबंधीचे उत्पादक शेतकऱ्याची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता अस्सल हापूस आंब्याला चांगला मान मिळणार असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top