आधारच्या मोफत अपडेटला मुदतवाढ

मुंबई

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) मायआधार पोर्टलद्वारे निशुल्क आधार माहिती अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. पुढील ३ महिने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. १५ डिसेंबर २०२३ ते १४ मार्च २०२४ पर्यंत नागरिकांना मोफत आधार अपडेट करता येणार आहे. मायआधार पोर्टलद्वारे कोणत्याही शुल्काशिवाय अपडेटची ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यूआयडीएआयने जारी केलेल्या निवेदनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोफत सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी उपलब्ध आहे. ज्यांनी गेल्या १० वर्षांत आधार अपडेट केले नाही अशा नागरिकांना त्यांचे आधार अपडेट करता येईल. ऑनलाइन अपडेट करता येणाऱ्या माहितीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top