आरक्षणासाठी घोडपदेवमध्ये युवकांचे मुंडण आंदोलन

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मुंबईतील घोडपदेव येथे मराठा कर्तव्य प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा मावळे आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढू जातीसाठी अशा घोषणा देत २५ युवकांनी मुंडण आंदोलन केले. आजपासून मुंबईच्या प्रत्येक भागात असे आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षण मिळे पर्यंत आमचा हा लढा सुरुच राहील, असा इशारा मराठा कर्त्यव्य प्रतिस्थान, महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष महेश थोरात यांनी दिला. उद्या भायखळा पश्चिम परिसरात मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top