आरक्षणासाठी हिंगोलीमध्ये तरुण-तरुणीची आत्महत्या

हिंगोली – वसमत तालुक्यातील नहाद येथे एका तरुणाने तर हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील एका तरुणीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीवन संपले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मयत आरती शिंदे यांच्यावर उत्तरीय तपासणी करून दिली जाणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली.

मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रीय असलेले नहाद येथील गोविंद कावळे यांनी विहीरीत उडी मारून जीवन संपवले. गोविंद हे मंगळवारपासून बेपत्ता होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील विहीरीत सापडला. त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. शिक्षणापासून दूर राहिलो आहे, तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही म्हणून मी जीवन संपवत असल्याचे त्यांनी चिट्ठीत लिहिले.

हिंगोलीत माळधामणी येथे आरती नागोराव शिंदे या १६ वर्षीय तरुणीने आज सकाळी साडे अकरा वाजता घरात जीवन संपवले. आरती ही मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होती. मंगळवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात देखील तिने सहभाग घेतला होता. बुधवारी सकाळी घरी कोणी नसतांना तिने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याची चिठ्ठी तिच्या जवळ सापडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top