आर्क्टिकमध्ये दोन महिन्यांची रात्र सुरू

वॉशिंग्टन

अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील शहर उटकियाविकमध्ये आता पुढील काही दिवस रात्रच असणार आहे. हे शहर अलास्कामध्ये आहे. शनिवारी इथे यावर्षीचा शेवटचा सूर्यास्त झाला. आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या परिसरात आता दोन महिन्यांची दीर्घ रात्र सुरू झाली आहे. आता २३ जानेवारी २०२४ रोजी इथे सूर्योदय होणार आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी तेथील लोकांना सूर्यदर्शन घडेल व हे दर्शन काही तासांचे असेल. त्यानंतर प्रत्येक नव्या दिवशी सूर्यप्रकाश वाढत जाईल. उटकियाविकला ‘बॅरो’ या नावाने ओळखले जात होते. मात्र सुमारे एक दशकापूर्वी या शहराचे नाव बदलून ते पारंपरिक अलास्काच्या नावानुसर ठेवण्यात आले. आर्क्टिक वर्तुळात असल्याने या शहरात दरवर्षी ६६ दिवस रात्र असते. शहरात पूर्णपणे अंधार नसतो, संध्याकाळच्या वेळेसारखी स्थिती असते. पृथ्वीच्या अक्षातील झुकलेल्या स्थितीमुळे असे घडते. अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे की, ज्यावेळी सूर्याचे केंद्र क्षितिजापासून ६ अंश खाली जाते त्यावेळी अशा दीर्घ रात्री सुरू होतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top