आ.आदित्य ठाकरेंचा उद्या नाशिक दौरा

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे १४ फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये ते आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सातत्याने दौऱ्यांचे नियोजन केले जात आहे.ल१४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता आदित्य ठाकरे वांद्र्याच्या कलानगर येथून वाहनाने इगतपुरी, नाशिक येथे रवाना होतील. दुपारी १ वाजता इगतपुरी येथे ते संवाद मेळावा घेणार आहेत. दुपारी २.१५ वाजता ते इगतपुरी येथून सिन्नरकडे मार्गस्थ होतील. ३.३० वाजता ते सिन्नर येथे संवाद मेळावा घेणार आहेत. सायंकाळी ४.१५ वाजता सिन्नरहून आदित्य ठाकरे नाशिकला रवाना होतील. सायंकाळी ५ वाजता ते नाशिक शहरात संवाद मेळावा घेतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top