इडीने केसीआर यांच्या कन्या के. कविता यांना अटक केली

हैदराबाद- दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीचे आमदार के. कविता यांना ईडीने आज अटक केली. प्राप्तिकर विभाग (आयटी) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या ११ (ईडी) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील निवासस्थानावर के. कविता आणि त्यांचे पती डी. अनिल कुमार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली. त्यांची चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. याआधीही ईडीने के. कविता यांची चौकशी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने कथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या संबंधात ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोणत्याही कारवाईपासून कविता यांना दिलेले संरक्षण १३ मार्चपर्यंत वाढवले ​​होते. ईडीने २१ फेब्रुवारी रोजी कविता समन्स बजावून २६ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कविता ईडीसमोर हजर झाल्या नाहीत याप्रकरणी आपचे नेते मनिष सिसोदिया यांना अटक झाली आहे. ते तिहार तुरुंगात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top