इस्रायली सैन्याचा गाझाच्या संसद भवनावर ताबा

तेल अविव इस्रायल – आक्रमक झालेल्या इस्रायलच्या सैन्याने गाझातील संसद भवनाचा ताबा घेतला आहे. हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलने हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली होती. त्यानंतर आता जमिनीवरून कारवाई सुरू केली. इस्रायली सैन्याने आज पहाटे गाझातील अल-शिफा रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयाच्या आत काही ठिकाणी सैनिक आणि हमासच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यावेळी रूग्ण आणि कर्मचारी यांच्यासह सुमारे २३०० लोक रुग्णालयामध्ये उपस्थित होते.

‘आम्ही अल-शिफा रुग्णालयातील निवडक लक्ष्यांवर हमासविरुद्ध ऑपरेशन सुरू केले. उत्तर गाझा पट्टीवर लष्कराचे पूर्ण नियंत्रण आहे. मात्र, हमासचे सैनिक भूमिगत बोगद्यात लपून बसले आहेत. आम्ही ते बोगदे ओळखले आहेत. आम्ही गाझा शहराच्या मध्यभागी आणि संसदेवरही कब्जा केला,’ असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ‘युध्दानंतर पॅलेस्टाईन अथॉरिटीने गाझाचे प्रशासन ताब्यात घ्यावे अशी अमेरिकेची इच्छा आहे, परंतु नेतन्याहू यांना गाझाच्या ताब्यासह प्रशासनही त्यांच्या हातात हवे आहे. नेतन्याहू आता अमेरिकेच्या मागण्याही मान्य करायला तयार नाहीत. हमासच्या खात्मानंतरही ते गाझावरील नियंत्रण सोडणार नाहीत, कारण त्यांचा कोणत्याही देशावर किंवा संघटनेवर विश्वास नाही,’ असे मत अरब देशांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या एका वरिष्ठ कमांडरचा खात्मा करण्यात आला, असा दावा इस्रायलच्या सैन्याने केला. अहमद सियाम असे हमासच्या कमांडरचे नाव आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top