इस्रायली सैन्याचा पॅलेस्टिनी शिबिरावर हल्ला! १४ ठार

जेरूसलेम –

इस्रायली सैन्याने काल एका पॅलेस्टिनी शिबिरावर हल्ला केला. या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युध्द सुरु आहे. युध्दात आता पर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्य सतत पॅलेस्टाईन वर कारवाई करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘वेस्ट बँकमधील शरणार्थी शिबिरावर इस्रायली सैन्याने हल्ला केला. इस्रायली सैन्याच्या या कारवाईत १४ लोकांचा मृत्यू झाला.’ याशिवाय गाझाच्या दक्षिणेकडील एका घरावरदेखील इस्रायली सैन्याने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ मुले,२ महिला आणि १ पुरुष यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top