इस्रायल-हमास युद्धामुळे सेन्सेक्सची घसरण कायम

मुंबई

इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. जागतिक बाजारात कमकुवत स्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. त्यानुसार आज सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ६६.१६६वर बंद झाला, तर निफ्टी १९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १९,७३१ वर स्थिरावला. आज मेटल स्टॉक तेजीत होते.

सेन्सेक्स आज ६६,२३८ वर खुला झाला. त्यानंतर तो ६६ हजारांपर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, टीसीएस, एशियन, पेंट्स, इंडसइंड बँक, सना फार्मा, एक महिंद्रा, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर घसरले, तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, एम अँड एम हे शेअर वाढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top