इस्रोची अंतराळात कचरामुक्त मोहीम

श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आपले रॉकेट अंतराळात कोणताही कचरा न करता आपली अंतराळ मोहीम पूर्ण केली आहे. इस्रोचे रॉकेट पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल ३ने अंतळारात कुठलाही कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला.अंतराळक्षेत्रातील ही एक महत्त्वाची घटना असून हा एक मैलाचा दगड असल्याचे सांगितले जात आहे.

२१ मार्च २०२४ रोजी रॉकेटने ही कामगिरी केली. इस्रोने एक्सद्वारे या मोहिमेची माहिती देत सांगितले की, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाने पीएसएलव्ही शून्य ऑर्बिटल डेब्रिज ही मोहीम पूर्ण केली. पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-३ हे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर नष्ट झाले. अंतराळात रॉकेट व नादुरुस्त उपग्रहांचा कचरा असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रोने राबवलेली ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे. प्रगत डेब्रिज ट्रॅकिंग सिस्टम, स्पेस-ऑब्जेक्ट डीऑर्बिटिंग तंत्रज्ञान आणि जबाबदार उपग्रह उपयोजन पद्धतीच्या अंमलबजावणीद्वारे अंतराळातील कचऱ्याचा धोका कमी करण्यासाठीच्या इस्त्रोच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top