उज्जैनच्या महाकाल मंदिरात आग पुजाऱ्यासह १३ भाविक होरपळले

उज्जैन – मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सकाळी भस्म आरती सुरू असताना अचानक आगिचा भडका उडाला. आग एवढया वेगाने पसरली की पुजारी आणि भाविकांना गर्भगृहातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे आगित पुजाऱ्यासह सुमारे तेरा जण होरपळून जखमी झाले.
गर्भगृहात आग लागताच भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. भाविक गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळू लागले. आगिचे वृत्त कळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगिवर नियंत्रण मिळविले.
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तेरा जण किरकोळ जखमी झाले. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. जखमींवर नजिकच्या सरकारी इस्तितळात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, उज्जैनच्या या महाकाल मंदिरात रविवारी सायंकाळपासून होळी उत्सवाला सुरुवात झाली.सायंकाळी हजारो भाविक आरतीसाठी महाकाल मंदिरात जमा झाले होते. आरतीनंतर भाविकांनी गुलालाची उधळण करीत होळीचा सण साजरा केला. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात होलिका दहन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top