उत्तराखंडच्या नानकमत्ता गुरुद्वाराच्या मुख्य जत्थेदाराची गोळ्या झाडून हत्या

डेहराडून- उत्तराखंडमधील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंग यांची हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना खतिमा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा तरसेम सिंग यांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षात उठबस असल्याने ते प्रसिद्ध होते.
ही घटना आज सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत असून यामध्ये तरसेम सिंग खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. यावेळी दोन हल्लेखोर शस्त्रांसह दुचाकीवर आले. तरसेम सिंग यांच्याजवळ पोहोचताच त्यांनी दुचाकी थांबवून त्यांच्या छातीत रायफलने गोळी झाडली. यानंतर तरसेम सिंग खुर्चीवरून उठले. ते धडपडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर आणखी एक गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तरसेम सिंग जमिनीवर कोसळले. दरम्यान, या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. हा परिसर उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्याच्या जवळ आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मारेकऱ्यांनी पूर्ण नियोजन करून हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top