उत्तराखंडमध्ये मजुरांना वाचवण्यासाठी अमेरिकेची ड्रिल मशीन दाखल

डेहराडून

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी तिसऱ्या दिवशीही शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. खराब झालेल्या ऑगर मशिनच्या जागी आता बोगदा खोदण्यासाठी दिल्लीहून अत्याधुनिक मशीन दाखल झाले आहे. याबाबत मदत आणि बचावकार्याचे नेतृत्व करणारे कर्नल दीपक पाटील म्हणाले की, ड्रिलिंगसाठी अमेरिकन बनावटीचे नवीन ऑगर मशीन मागवले आहे. हे मशीन वेगाने काम करेल. आता या मदत आणि बचावकार्यात मिलिटरी ऑपरेशन टीमही सक्रिय झाली आहे.

बोगदा खणण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता दिल्लीहून हे नवीन मशीन मागवण्यात आले. ते आज हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने उत्तरकाशीला बोगद्याजवळ पोहोचले. हे यंत्र एका तासात ५ मीटरपर्यंत ड्रिल करू शकते. ढिगाऱ्यापासून सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर कामगार अडकले आहेत, अशा परिस्थितीत येत्या काही तासांत कामगारांसाची सुटका होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top