उत्तर कोरियाला अमेरिकन संस्कृतीचे वावडे

प्योंगयांग- उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग उन याचा अमेरिका आणि एकूणच पाश्चिमात्य देशांतील मुक्त संकृतीला प्रखर विरोध आहे. आपल्या देशातील तरुणांनी अमेरिकनांसारखे वागू नये याकडे त्याचा कटाक्ष असतो. अगदी पाश्चिमात्य देशांतील जीन्स पँट -टी शर्ट यासारख्या पेहरावालाही त्याचा विरोध आहे. हा विरोध किती टोकाचे आहे याचे एक उदाहरण पुन्हा समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या केसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीवर बीबीसी या वाहिनीसाठी काम करणाऱ्या कलाकाराचा बागकामासंबंधीचा एक शो प्रसारित करण्यात आला होता. त्याने निळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट असा पेहराव केला होता. केसीटीव्हीने त्याचा कार्यक्रम तर प्रसारित केला. पण व्हिडिओमध्ये त्याची जीन्स पँट दिसू नये म्हणून कंबरेपासूनचा भाग अस्पष्ट करण्यात (ब्लर) आला होता. आपल्या देशातील तरुणांना त्याची जीन्स पाहून आपणही जीन्स वापरावी, अशी इच्छा होऊ नये यासाठी हा हास्यास्पद खटाटोप करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top