उत्तर प्रदेशमध्ये उभारले जातेय ७० मजली गगनचुंबी मंदिर

लखनौ- उत्तर प्रदेशच्या वृंदावन जिल्ह्यात ७० मजल्यांचे एक गगनचुंबी मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिर उभारणीचा अंदाजे खर्च तब्बल ६६८ कोटी रुपये आहे. वृंदावन चंद्रोदय मंदिर असे या गगनचुंबी मंदिराच्या इमारतीचे नाव आहे. या इमारतीमध्ये एका वेळी तीन हजार वाहने पार्क केली जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
इस्कॉन या संस्थेच्या वतीने या मंदिराची उभारणी केली जात आहे. हे मंदिर धार्मिक पर्यटनाचे एक प्रमूख स्थळ बनणार असून देश विदेशातून लाखो पर्यटक मंदिराला भेट देतील,अशी अपेक्षा आहे,असे इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि जागतिक हरे कृष्ण मोहिमेचे उपाध्यक्ष चंचलपती दास यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना सर्वाधिक आकर्षण हे भारताच्या समृध्द अशा प्राचीन संस्कृतीचे, धार्मिक स्थळांचे आणि चालरितींचे असते. भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी पर्यटकाला भारतीय संस्कृतीचा अनुभव घ्यायची इच्छा असते. वृंदावन चंद्रोदय मंदिर हे अशा परदेशी पर्यटकांसाठी भारतातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे,असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top