उद्धव ठाकरे यांची आज बोईसर येथे जाहीर सभा

पालघर
पालघर लोकसभा उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी चार वाजता बोईसर येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून भारती कामडी यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीतून पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला सुटली असून या जागेवर ठाकरे गटाने भारती कामडी यांना उमेदवारी दिली. कामडी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शहरातील प्रतिष्ठितांच्या भेटी घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top