उल्हासनगर सरकारी रुग्णालयात तृतीयपंथीसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू

उल्हासनगर- तृतीयपंथी या समाजातील वंचित घटकासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र वार्ड उभारण्याचा राज्यातील पहिला मान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाला मिळाला आहे.या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन नुकतेच आमदार कुमार आयलानी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्या हस्ते काल शनिवारी करण्यात आले.
किन्नर अस्मिता संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सत्वा संस्थेच्या कम्युनिटी लेड मॉनिटरिंग या उपक्रमांतर्गत हा तृतीयपंथीसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
अतिदक्षता विभागातील सुविधांसह स्वतंत्र बेडची व्यवस्था येथे करण्यात आली असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तृतीयपंथीयांना करावी लागणारी फरपट यामुळे थांबणार आहे.उल्हासनगर कॅम्प ३ येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात हा स्वतंत्र वॉर्ड सुरू झाला आहे. या वॉर्डमध्ये चार बेड असणार आहेत.इतर रूग्णांना मिळणार्‍या सर्व सेवा येथे येणार्‍या तृतीयपंथी रुग्णाला मिळणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार पप्पू कलानी,धनंजय बोराडे, नाना बागूल तसेच डॉक्टर, कर्मचारी आणि तृतीयपंथी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top