एअर इंडियाचे रुपडे पालटणार नववर्षात नवा गणवेश दिसणार

  • डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कल्पकता

मुंबई – उद्योगपती जे.आर. डी टाटा यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या एअर इंडियाचे आता रुपडे पालटणार आहे.नव्या युगाला साजेसा गणवेश परिधान करून एअर इंडियाचे वैमानिक आणि कर्मचारी नवीन वर्षात काम करणार आहेत.पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने त्याचा वापर सुरू केला जाणार आहे.

एअर इंडियाच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा बदल करण्यात येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आपली कल्पकता वापरून हा गणवेष तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने लाल, जांभळा आणि सोनेरी रंग वापरला आहे.गणवेश बनवताना भारतीय संस्कृती आणि परंपरा,अद्ययावत फॅशन,वापरण्यातील सुलभता आणि रुबाबदारपणा यांचा विचार केला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे डिझाइन तयार करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आभार आणि समाधान व्यक्त केले आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कँपबेल विल्सन यांनी नवा गणवेश भारतीय परंपरा आणि मनीष मल्होत्रा यांच्या कल्पकतेला साजेसा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने कंपनीच्या भविष्यात नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.कंपनीचे साधारण दहा हजार कर्मचारी असून त्यांना नवीन गणवेशाचे वेगवेगळ्या टप्प्यात वितरण केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top