एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची कर्जत शहरात आत्महत्या

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील १९ वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल महाले असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षांला शिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हर्षलच्या खोलीमध्ये राहणारे तीन सहकारी विद्यार्थी त्याचा छळ करत होते. त्यांच्या छळाला कंटाळून हर्षलने खोलीमध्ये कुणी नसताना सायंकाळच्या सुमारास छताला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पालकांना खोलीत एक सुसाईड नोट आणि त्याचा मोबाईल फोन आढळून आला.सुसाईड नोटमध्ये हर्षलने लिहिले आहे की, माझ्या खोलीतील सहकारी माझा मानसिक छळ करायचे. त्यांच्या मानसिक छळामुळे मी आत्महत्या करत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. कर्जत पोलिसांनी संबंधित तीन विद्यार्थ्यांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top