एलआयसीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई

मुंबईतील एलआयसीच्या ६८ इमारती पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. या सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे इमारतींमधील सदनिका धारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या इमारतींमध्ये सुमारे ५०० सदनिका आहेत. यासंदर्भात एलआयसीचे संबंधीत अधिकारी यांची प्रशासनासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर एलआयसीच्या ६८ इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देत पुर्नविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील एलआयसीच्या ८० ते १०० वषपिक्षा जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात या इमारतींचे छप्पर कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे एलआयसीच्या इमारतींचा पुर्निविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलआयसी इमारतींमधील सदनिकाधारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, केंद्रीय अर्थमंत्री यांची सदनिका धारकांच्या शिष्टमंडळासह भेट घेण्यात येईल, यावेळी प्रचलित कायद्यात दुरूस्ती सुचविणारा प्रस्ताव सादर केला जाईल, पुनर्विकासाच्या कार्याला गती मिळावी यासाठी म्हाडाने तातडीने पावले उचलावीत, सदनिका धारकांशी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी नम्रतापूर्वक व्यवहार करावा, सदनिका रिकामी करण्याची कार्यवाही सध्या थांबवावी अशा सूचना बैठकीवेळी प्रशासनाकडून देण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top