ऑस्ट्रेलियन सिनेटमध्ये घोष यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली

कॅनबेरा- भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष यांची ऑस्ट्रेलियाच्या सिनेटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून सिनेट सदस्य म्हणून शपथ घेतली. भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे घोष हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील पहिले सिनेटर आहेत. याबद्दल ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वँग यांनी त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियाची विधानसभा आणि विधान परिषदेने त्यांची फेडरल संसदेच्या सिनेटमध्ये ऑस्ट्रेलियन राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली.
पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मजूर पक्षाने घोष यांची अधिकृतपणे निवड केली आहे. पुढील आठवड्यात ते सिनेटमध्ये आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. वरुण हे फ्रान्सिस बर्ट चेंबर्स येथे विद्यमान सिनेटर पॅट्रिक डॉडसन यांची जागा घेतील. शपथविधीनंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घोष यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियाच्या अनेक मंत्र्यांनीही घोष यांचे अभिनंदन केले. परराष्ट्र मंत्री पेनी वाँग म्हणाले, ‘ भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे सिनेटर घोष हे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेटर आहेत.
घोष यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी मिळवली. ते विद्यापीठाच्या गिल्ड कौन्सिलमध्ये अध्यक्ष आणि सचिव म्हणून सक्रियपणे सहभागी झाले होते. सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक बँकेसाठी वित्त वकील आणि सल्लागार म्हणून काम केले. ते २०१५ मध्ये किंग अँड कंपनीमध्ये वरिष्ठ भागीदार म्हणून ऑस्ट्रेलियाला परतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top