ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमधील पर्यटक! गुलाम आझाद यांची टीका

श्रीनगर- माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मिरमध्ये केवळ पर्यटनासाठी येतात, अशी टीका डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर केली आहे. गुलाम नबी आझाद काल डोडा शहरातील एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमधील पर्यटक आहेत. ते उन्हाळ्यात लंडनमध्ये त्यांच्या आजोबांच्या घरात असतात आणि हिवाळ्यात ते इतर देशांना भेटी देतात. जम्मू-काश्मिरमध्ये अब्दुल्ला केवळ पर्यटनासाठी येतात. त्यांना जम्मू-काश्मीरच्या राजकारणाची माहिती नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top