ओरोसमध्ये १५ फेब्रुवारीपासून आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिजामाता संकुल ओरोस येथे आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आनंदोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक किर्तीचे अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. तसेच त्यांना कृषी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. यानंतर माशेलकर जिल्ह्यातील शेतकरी उद्योजक व विद्यार्थी यांच्यासोबत खास संवाद साधणार आहेत. १५ फेब्रुवारीला मोफत आयुर्वेदिक / अॅलोपॅथी शिबिर होईल. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top