कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

बंगळुरू

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश काल त्यांच्या बंगळुरूमधील घरी मृतावस्थेत आढळले. त्यांना राजाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेले होते, मात्र डॉक्टरांनी ते मृत असल्याचे सांगितले. ते ५५ वर्षांचे होते. या घटनेमुळे कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी महालक्ष्मी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

दरम्यान, सौंदर्या जगदीश हे नुकतेच वादात सापडले होते. त्यांचा जेट लॅग नावाचा पब असून तो पब परवानगी नसतानाही ठराविक वेळेपेक्षा जास्त काळ चालवल्याचा आरोप झाला होता. परवानगी नसलेल्या वेळेत पार्टी आयोजित केल्याबद्दल पबवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्टीत लोकप्रिय अभिनेते दर्शन, धनंजय, रॉकलाइन व्यंकटेश आणि इतर कलाकारही उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी दर्शनची चौकशी केली होती आणि आरोपपत्रात ती तर डिनर पार्टी होती, असे म्हटले होते. जगदीश यांनी ‘अप्पू पप्पू’, ‘स्नेहितरू’, ‘रामलीला’ आणि ‘मस्त मजा माडी’ यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. ते कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. अनेक कन्नड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top